मामलेदारांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आढावा
वार्ताहर /केपे
केपे उपजिल्हाधिकारी कार्यालयातर्फे केपे तालुक्मयातील सर्व अधिकाऱयांची आपत्ती व्यवस्थापनविषयक बैठक मामलेदार प्रताप गावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात मान्सूनपूर्व कामे 80 टक्के पूर्ण झाली असून राहिलेली कामे चालू आहेत, असे स्पष्ट करण्यात आले. या बैठकीत वीज, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, वन व इतर सर्व संबंधित खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
मान्सनपूर्व कामांचा आढावा घेण्याकरिता बोलावलेल्या या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. केपे तालुक्मयात 11 पंचायती व दोन पालिकांचा समावेश असून बहुतेक भाग वनक्षेत्राचा असल्याने पावसाच्या दिवसांत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार होत असतात. त्यावर तसेच रस्त्याच्या बाजूने वाढलेली धोकादायक झाडे, भरलेली गटारे, धोकादायक जुने वीजखांब अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ताबडतोब हे प्रश्न संबंधित अधिकाऱयांनी लक्ष घालून सोडवावेत, असे मामलेदारांनी अधिकाऱयांना सांगितले.
मान्सूनच्या तयारीबरोबरच वीज, सार्वजनिक बांधकाम, वनखाते या सर्वांनी राहिलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, असा निर्देश यावेळी देण्यात आला. मोरपिर्ला भागात वाढत असलेल्या डेंग्यू रुग्णांचाही आढावा मामलेदारांनी घेतला. पावसाच्या दिवसांत आपला आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला जावा याकरिता आरोग्य खात्याने जागृती करावी असाही मुद्दा चर्चेत आला. आता 1 जून रोजी खास बैठक बोलावली असून त्यात दोन्ही पालिकांचे मुख्याधिकारी, आरोग्य खात्याचे प्रतिनिधी व इतर संबंधित सहभागी होणार आहेत.