आता पेमेन्ट्स प्लॅटफॉर्म ब्लॉकवर लक्ष केंद्रीत करा
वृत्तसंस्था /नवी दिली
फेक खात्यांची वास्तविक संख्येसह सुरु असणाऱया वाद-विवादाच्या दरम्यान जॅक डोर्सी यांनी ट्विटरचे संचालक मंडळाचे पद सोडले आहे. कंपनीचे सह संस्थापक डोर्सी यांनी मागील वर्षातील नोव्हेंबरमध्ये ट्विटरचे सीईओपद सोडले होते आणि त्या जागेवर मूळ भारतीय असणारे पराग अग्रवाल यांची नियुक्ती केली होती. तेव्हा अग्रवाल हे कंपनीचे सीटीओ होते.
संचालक मंडळाचे पद सोडून दिल्यानंतर आता डोर्सी हे आपल्या आर्थिक पेमेन्ट प्लॅटफॉर्म ब्लॉकवर लक्ष केंद्रीत करणार असल्याची माहिती आहे.
44 अब्जडॉलरमध्ये ट्विटर खरेदीचा व्यवहार
टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क हे 44 अब्ज डॉलरमध्ये ट्विटरची खरेदी करण्यासाठी व्यवहार केला आहे. त्यांनी 17 मे रोजी या व्यवहाराला थांबविण्याची घोषणा केली होती. मात्र यावरुन आता वेगळेच तर्कवितर्क व्यक्त होताना दिसत आहेत.