प्रतिनिधी /बेळगाव
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी संचालित लोककल्प फौंडेशनतर्फे कणकुंबी जंगलात दुर्गम भागात असलेल्या सडा गावात धान्य व गृहोपयोगी वस्तुंचे मोफत वितरण करण्यात आले. फौंडेशनचे संचालक अजित गरगट्टी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.
सोसायटीचे व फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध दत्तक खेडय़ांत आरोग्य तपासणी शिबिर, नेत्रचिकित्सा शिबिरे, व्यावसायिक मार्गदर्शन व इतर समाजोपयोगी कार्यक्रम राबविले जातात. या वितरणाबद्दल सडा ग्रामस्थांनी फौंडेशनचे आभार मानले. याप्रसंगी फौंडेशनचे सर्व स्वयंसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.