म्हापसा बाजारात मिरची खरेदीसाठी महिलांची झुंबड : लग्न समारंभावेळी घरी मसाला बनविण्याची प्रथा कायम
प्रतिनिधी /पर्वरी
मसल्याच्या पदार्थाचे वाढते दर पाहता विकत आणलेल्या तयार मसाल्यापेक्षा घरगुती मसाल्याला पर्वरी आणि परिसरातील भागात अधिक पसंती मिळत आहे. त्यामुळे दर शुक्रवारी म्हापसा बाजारात मिरची खरेदी करण्यासाठी महिलांची झुंबड उडलेली दिसून येत आहे.
आज बाजारात वर्षभर सर्व पदार्थ मिळत असतात. पण जसजसा पावसाळा जवळ येऊ लागताच काही लोक बेगमी करायला सुरुवात करतात. त्यात गरम मसाला, हळदी पावडर, मिरची पूड यांचा समावेश असतो. पदार्थांची रुची वाढविणाऱया विविध प्रकारच्या नाना कंपनीच्या मसाल्यांची पाकिटे सुपर मार्केटमध्ये पाहायला मिळतात. भेसळयुक्त तयार मासल्यांची चव जिभेला छान वाटत असली तरीही आरोग्यावर वाईट परिणाम होतात. त्यात त्यांचे दरही वाढल्याने महिलाना मसाल्याचे विविध पदार्थ आणून घरातच मसाले तयार करणे जास्त सोयीचे वाटते. घरात एखाद्या लग्न समारंभ प्रसंगी मसाला तयार करण्याची प्रथा आहे. आजही काही लोक ती परंपरा जोपासत आहेत.
लाल मिरची दरात प्रचंड वाढ
मागील वर्षाच्या तुलनेने यावषी मिरचीचे दर भयंकर वाढलेले आहेत. म्हापसा बाजारात ऐन मोसमात मिरची 900 ते 1200 रुपये प्रती किलो इतकी विकली जात होती. तरीही लोक मिरची खरेदी करताना दिसत होते. येथील एक मसाला गिरणी मालक शिरीष कुंभार यांनी सांगितले की, बाजारात मिरचीचे दर वाढले असले तरी आम्ही मसाला दळून देण्याचे दर वाढविले नाहीत. सध्या मसाला प्रती किलो रुपये 40 असा आहे. लोक मोठय़ा प्रमाणात येथे मसाला तयार करून घेण्यासाठी येत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही घरगुती बनविलेलाच मसाला जेवण तयार करण्यास वापरतो. या मसाल्याने पदार्थ रुचकर बनले जात असल्याचे समाधान मिळते, असे मनीषा कोरगावकर या गृहिणीने सांगितले.
महिला दरवषी मे महिन्यात बाजारात जाऊन मिरच्या तसेच त्याला लागणारे मसाल्याचे विविध प्रकार खरेदी करतात. मे महिन्याच्या कडक उन्हात मिरच्या सुकवून व मसाल्याचे पदार्थ भाजून मसल्याच्या गिरणीत हा घरगुती मसाला तयार करून वर्षभर त्याची साठवणूक केले जाते. शक्मयतो मसाला एप्रिल, मे महिन्यात बनविणे चांगले असते. कारण या महिन्यात तापमान अधिक उष्ण असल्याने मिरची व मसाल्याचे पदार्थ चांगले सुकतात त्यामुळे मसाला चांगला तयार होतो व वर्षभर टिकतो. या घरगुती मसाल्यात कुठल्याच रासायनिक पदार्थाची भेसळ नसल्याने आम्ही बिनधास्तपणे याचा वापर करू शकतो व आमच्या कुटुंबाचे आरोग्य संभाळू शकतो. असे एका महिलेने सांगितले.