वार्ताहर /माशेल
माशेल केंद्रातर्फे पूज्य साने गुरुजी यांचा पुण्यतिथी कार्यक्रम माशेल येथील शारदा इंग्लिश हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शारदा इंग्लिश हायस्कूलचे मुख्याध्यापक योगानंद नागवेकर, स्वरुपा उपाध्ये, विषया पाटील, प्रार्थना गावडे व विनय गावकर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी गायिलेल्या ‘खरा तो एकची धर्म’ प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. मुख्याध्यापक योगानंद नागवेकर यांनी दीपप्रज्वलन करून साने गुरुजींच्या तसबिरीला पुष्पहार अर्पण केला. श्री. नागवेकर यांनी विद्यार्थ्यांना साने गुरुजींच्या कार्याची माहिती दिली. विनय गांवकर, सौ. उपाध्ये यांनीही साने गुरुजी विषयी मुलांना सांगितले. विषया पाटील यांनी सूत्रसंचालन तर प्रार्थना गावडे यांनी आभार मानले.