सातार्डा/ वार्ताहर –
गोव्याहून सातार्डा येथे वेगात येणाऱ्या दुचाकीस्वराने पोलीस चेक याठिकाणी अल्टो कारला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार मधुकर नाईक हा अल्टो कारला आदळून रस्त्यावर पडून जागीच ठार झाला. मधुकर नाईक हा धारगळ – गोवा येथे रहात होता. गोव्याला जाणाऱ्या अल्टो कार चालक रामचंद्र कृष्णाजी देसाई, रा – दोडामार्ग यांनी सातार्डा पोलीस स्थानकामध्ये खबर दिली. बांदा येथील प्राथमिक केंद्रात शव विच्छेदन करण्यात आले. अधिक तपास सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यशवंते, पोलीस हवालदार एन आर कुडतरकर,जी व्ही नाईक करत आहेत.