मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन. विद्यार्थ्यांच्या बौध्दीक आणि संस्कारक्षम शिक्षणासाठी नवीन धोरण लाभदायक. डिचोली रोटरी क्लबच्या सदगुरु कृष्णा शेटय़? स्कुल इमारतीची पायाभरणी.
डिचोली/प्रतिनिधी
केंद्र सरकारतर्फे जारी करण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्य सरकारतर्फे सुरू करण्यात आली असून सदर धोरण सर्व खासगीही शाळा हायस्कुलांमध्ये चालीस लावण्यासाठी शिक्षण संस्था?नी पुढे यावे. शैक्षणिक क्षेत्रात या धोरणाद्वारे येणारा बदल आत्मसात करणे प्राथमिक स्थरावर कठीण असणार. परंतु त्यासाठी सर्वांनी समजूतदारपणा दाखवून प्रारंभ केल्यास ते सोपे होईल. नवीन शिक्षण धोरण हे विद्यार्थ्यांच्या संस्कारीत व बौध्दीक शिक्षणासाठी लाभदायक ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डिचोली येथे केले.
डिचोली रोटरी क्लबतर्फे साकारण्यात येणाऱया सदगुरु कृष्णा शेटय़? स्कुलच्या इमारतीच्या पायाभरणी सोहळय़ात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष कुंदन फळारी, डिचोली रोटरी क्लबचे अध्यक्ष सुदिन नायक, स्कुल इमारतीसाठी जागा दान केलेले सदगुरु कृष्णा शेटय़?, हर्षा सदगुरु शेटय़?, रोटरी स्कुलचे अध्यक्ष सुदत्त मांदेकर, रोटरीचे सचिव अँड. अमोल सावंत आदींची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना लहान वयात संस्कारक्षम आणि बौध्दीक शिक्षणाची आवश्यकता असते. सात वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांवर होणारे संस्कार आणि त्यांना देण्यात येणाऱया शिक्षणाचा मोठा प्रभाव त्यांच्या भविष्यासाठी असतो. नवीन शैक्षणिक धोरण या गोष्टी लक्षात घेऊनच तयार करण्यात आले आहे. संस्कार आणि शिक्षण यांची सांगड घालत या धोरणामार्फत विद्यार्थ्यांना मिळणाऱया शिक्षणातून चांगली नवीन पिढी तयार होणार आहे. त्यासाठी खासगी शिक्षण संस्था?नीही पुढाकार घेणे आवश्यक आहे. असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या स्कुलसाठी जागा दान दिलेल्या सदगुरू कृष्णा शेटय़? व हर्षा स. शेटय़? यांचे कौतुक करताना आपल्या शहरासाठी सामाजिक कार्य करण्याची इच्छा मनात असल्यास सामाजिक क्षेत्रात मोठे कार्य घडणार. असा स्वभाव व विचार प्रत्येक व्यक्तीने मनत आणून कार्य केल्यास समाजात परिवर्तन येण्यास वेळ जाणार नाही. सर्वच काही सरकारवर न सोडता आपण या समाजासाठी काय करू शकतो याचा विचार करून पुढे यायला हवे. डिचोलीत रोटरी क्लबचे स्कुल चांगली कामगिरी बजावत आहे. त्यांची हे कार्य असेच चालू ठेवताना समाजाला संस्कारीत व साक्षर बनविण्यासाठी झटावे, असेही म्हटले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते जागा दान देणाऱया सदगुरु शेटय़? व हर्षा शेटय़? यांचा सत्कार करण्यात आला. हर्षा शेटय़? यांनी आपले विचार मांडताना, डिचोली शहरात समाजासाठी काही तरी करायची इच्छा मनात असताना रोटरी क्लबने हि सेवा करण्याची संधी दिली. या संधीचा लाभ उठवत आम्ही दिलेल्या जागेचा चंगला उपयोग रोटरी क्लबतर्फे होणार यात शंका नाही, असे म्हटले.
स्वागत रोटरी क्लबचे अध्यक्ष सुदिन नायक यांनी केले. स्कुलचे अध्यक्ष सुदत्त मांदेकर यांनी स्कुलच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन शाळा इमारतीची पायाभरणी करण्यात आली. तर आभार दुर्गेश कारापूरकर यांनी मानले.