मुलाच्या मृत्यूनंतर अनोख्या प्रथेचे पालन
जगात अनेक परंपरा तसेच प्रथा मानणारे लोक आहेत. या परंपरांचे धर्म किंवा परिसरातील मान्यतांच्या हिशेबाने पालन केले जाते. इंडोनेशियात एका समुदायाचे लोक मृत मुलांच्या शवाला झाडाच्या खोडात छिद्र पाहून त्यात दफन करतात. तेथे मृतदेह झाडामध्ये दफन करण्याची प्रथा आहे.
इंडोनेशियाच्या ताना तरोजामध्ये या अजब परंपरेचे पालन केले जाते. येथे राहणारे लोक अन्य प्रौढ व्यक्तींवरील अंत्यसंस्कार सर्वसाधारण पद्धतीने करतात. परंतु एखाद्या लहान मुलाचा मृत्यू झाल्यास मृतदेह झाडाच्या खोडात दफन करण्यात येतो. मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांमध्ये शोकाचे वातावरण असले तरीही स्वतःच्या मुलाला निसर्गासोबत जोडण्याचा निर्णय ते घेतात.
इंडोनेशियातील हा समुदाय स्वतःच्या मुलांच्या मृत्यूनंतर ही पद्धत अवलंबितात. याकरता प्रथम झाडाच्या खोडाला आतून पोकळ केले जाते, मग मुलाचा मृतदेह या पोकळ जागेत कपडय़ात गुंडाळून ठेवण्यात येतो. यामुळे मृतदेह हळूहळू नैसर्गिक स्वरुपात या झाडाचाच हिस्सा होत जातो. अशाप्रकारे जगातून निघून गेल्यावरही ते मूल झाडाच्या रुपात कायमस्वरुपी तेथेच राहत असल्याचे या समुदायाचे मानणे आहे.
या परंपरेचे पालन इंडोनेशियाच्या मकास्सर येथून सुमारे 186 मैल अंतरावरील ताना तरोजामध्ये केले जाते. लोक स्वतःच्या मुलांना झाडाच्या खोडात दफन करतात आणि झाडालाच स्वतःचे मूल समजू लागतात. झाडांच्या खोडातील जागा या समुदायाचे लोकच तयार करतात. देवाने आपले मूल हिरावून घेतले तरीही ही परंपरा मुलाला दूर जाऊ देत नसल्याचे या लोकांचे मानणे आहे.