चांगली नोकरी सोडून निवडला भ्रमंतीचा मार्ग
एमी निकोल्सन नावाच्या 35 वर्षीय महिलेने स्वतःच्या जीवनाला 360 अंश डिग्रीत बदलले आहे. ब्रिटनच्या केंटमध्ये राहून 9-5 वाजेपर्यंत नोकरी करणारी एमी आता एका व्हॅनमधून जगभ्रमंती करत आहे. ही व्हॅन घेऊन ती जगातील विविध हिस्स्यांची सैर करत आहे.
35 वर्षीय एमीने कोरोना महामारीदरम्यान स्वतःची रटाळ 9-5 वाजेपर्यंतची नोकरी बदलण्याचा निर्णय घेतला. तिने एक व्हॅन खरेदी केली. याची किंमत 9 लाख 60 हजार रुपये होती. लॉकडाउनदरम्यानच एमीने या व्हॅनला वास्तव्ययोग्य घरात बदलून टाकले.
एमी आता कॉर्नवॉल येथे राहते. स्वतःची ऑफिसची नोकरी सोडून आता वर्क फ्रॉम होम करते आणि मार्केटिंग कंसल्टेंट म्हणून चांगले पैसे कमाविते. एमी यापूर्वी लंडनमध्ये मार्केटिंग असिस्टंट म्हणून 9-5 वाजेपर्यंत नोकरी करायची. परंतु तिने व्हॅन खरेदी करत त्यात वास्तव्याची सुविधा निर्माण केली आहे. तिच्या व्हॅनमध्ये सर्व गोष्टी इलेक्ट्रिक आहेत. आईवडिलांच्या घरात राहताना व्हॅनचे जीवन स्वीकारले, एक मोठी व्हॅन घेतल्याने घराच्या सुविधांनुसार त्यात बदल करता आल्याचे एमी सांगते.
व्हॅन हाउसमध्ये 3 खिडक्या तयार करत तिने व्हेंटिलेशन आणि दिवसरात्र प्रकाशाची सुविधा निर्माण केली आहे. व्हॅनमध्ये एमीने सौर ऊर्जा यंत्रणा बसविली असल्याने पूर्ण व्हॅनमध्ये इलेक्ट्रिक सिस्टीम काम करते. व्हॅनमध्ये वॉल्स आणि सीलिंग लावल्याने तिने पेंटिंग केले आहे. तसेच काही स्टोरेजची जागा तसेच कपाटही तयार करवून घेतले आहे. क्हॅनमध्ये सोफा, टेबल आणि काही प्रमाणात फर्निचर देखील आहे.