श्रीनगर
काश्मीरमध्ये झालेल्या कॉन्स्टेबल मुश्ताक अहमद यांच्या हत्येची जबाबदारी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरियाने (इसिस) स्वीकारली आहे. तथापि, आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी यावर जास्त भाष्य केले नाही, मंगळवारी दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या लाल बाजार भागातील ब्लॉकवर तैनात असलेल्या पोलीस पथकावर गोळीबार केला होता. या गोळीबारात कॉन्स्टेबल मुश्ताक अहमद गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. या हल्ल्यात अन्य दोन पोलीसही जखमी झाले आहेत.