नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवरी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी भेटीसाठी राष्ट्रपती भवनात पोहोचल्यानंतर दोघांमध्ये विविध मुद्यांवर चर्चा झाली. या बैठकीचा तपशील अद्याप उपलब्ध झालेला नाही. राष्ट्रपती कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी म्हणजेच्या आणखी 11 दिवसांनी संपत आहे. या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. राष्ट्रपती सचिवालयाने यासंबंधीची माहिती देताना भेटीचे छायाचित्रही ट्विट केले आहे. देशात सध्या नव्या राष्ट्रपतींच्या निवडीचा प्रचार सुरू आहे. राष्ट्रपती पदासाठी 18 जुलै रोजी मतदान होणार असून 21 जुलै रोजी निकाल लागणार आहे. एनडीएने द्रौपदी मुर्मू यांना या पदासाठी उमेदवारी दिली आहे. त्यांची लढत यशवंत सिन्हा यांच्याशी होत आहे.