वृत्तसंस्था/ साऊथ्मपटन (ब्रिटन)
2022 च्या महिलांच्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेत ऑस्ट्रियाने नॉर्वेचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे. या स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात इंग्लंडने उत्तर आयर्लंडचा पराभव केला.
शुक्रवारी या स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या अटितटीच्या सामन्यात ऑस्ट्रियाने नॉर्वेचा 1-0 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यातील एकमेव गोल ऑस्ट्रियाच्या निकोली बिलाने 37 व्या मिनिटाला हेडरद्वारे हेनशॉच्या पासवर केला. मध्यंतरापर्यंत ऑस्ट्रियाने नॉर्वेवर 1-0 अशी आघाडी मिळविली होती. नॉर्वेला या सामन्यात शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. आता ऑस्ट्रियाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना जर्मनी बरोबर होणार आहे.
या स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात इंग्लंडने उत्तर आयर्लंडचा 2-0 असा पराभव केला. इंग्लंडतर्फे 40 व्या मिनिटाला प्रेन किरबायने पहिला गोल तर ऍलिसिया रुसोने दुसरा गोल केला. उत्तर आयर्लंडला या सामन्यात आपले खाते उघडता आले नाही. या स्पर्धेत इंग्लंडने आपल्या गटातून आघाडीचे स्थान मिळविले आहे.