भांदूर गल्लीतील प्रकार : रस्त्याच्या विकासकामामुळे नागरिकांना डोकेदुखी
प्रतिनिधी / बेळगाव
भांदूर गल्ली परिसरातील रस्त्याच्या विकासासाठी काम हाती घेण्यात आल्याने रहिवाशांची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या दोन महिन्यापूर्वी खोदून ठेवण्यात आलेल्या रस्त्यामुळे वाहनधारकांचे हाल होत आहेत. मंगळवारी सकाळी मालवाहतूक करणारे टेम्पो रस्त्यावरून ढकला त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागला.
परिसरातील नागरिक आणि रिक्षाचालकांच्या मदतीने टेम्पो बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण खोदण्यात आलेल्या चरित वाहनांची चाके रूतल्याने वाहन निघता निघेनासे झाले. त्यामुळे वाहन चालकाला उतरवून गाडी बाहेर काढावी लागली.
येथील रस्त्याचे काम दोन महिन्यांपासून सुरू असून कधी पूर्ण होणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. वाहनधारक वृद्ध आणि शाळकरी मुलांना रस्त्यावरून जाणे मुश्कील बनले आहे. गटारीचे काम देखील निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याने सळ्या बाहेर पडल्या आहेत. पादचारी चुकून पडल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे याकडे प्रशासनाने लक्ष देऊन तातडीने उपाय योजना राबवाव्यात अशी मागणी होत आहे.