प्रतिनिधी /खानापूर
खानापूरहून कुंभार्डा येथे जाणारी कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची बस वळणावरील झाड चुकविण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्या नजिकच्या गटारीत कलंडली. ही घटना काल सायंकाळी पडलवाडी गावानजीक घडली.
या घटनेत सुदैवाने बस मधील कोणीही प्रवासी जखमी झाले नाहीत. दरम्यान आज सकाळी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस बाजूला करण्यात आली. अशा घटना वारंवार घडत असून त्या टाळण्याची व्यवस्था करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.