डबल एअर बॅगसोबत मिळणार 25.30 केमीपीएल मायलेज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वाहन निर्मिती क्षेत्रातील कंपनी मारुती सुझुकीने आपली मिनी एसयूव्ही म्हणजेच एस-प्रेसो या मॉडेलचे (2022) सादरीकरण केले आहे. सदरच्या मॉडेलला नेक्स्ट जनरेशन के सीरीज 1.0 लिटर डबल जेट, डबल व्हीव्हीटी इंजिनसह लाँचिंग करण्यात आले आहे.
कारमध्ये आयडल स्टार्ट स्टॉप टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. कंपनीने म्हटले आहे, की आधी दाखल केलेल्या मॉडेलचे मायलेज 21.7 केमीपीएल इतके होते मात्र त्यामध्ये आता वाढ होणार असल्याची माहिती आहे. तर न्यू एस-प्रेसो व्हीएक्सआय(ओ) आणि व्हीएक्सआय(ओ) एजीएस हे मॉडेल 25.30 किमी मायलेज देणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. सदरच्या मॉडेलच्या किमती या 4.25 लाख रुपयांपासून सुरु होणार आहे.
मॉडेलमधील अन्य फिचर्स
w स्टीयरिंग माउंटेड ऑडिओ व व्हॉइस कंट्रोल सिस्टम
w दमदार इंजिन आणि कम्फर्ट डिझाइन
w न्यू एस-प्रेसोमध्ये नेक्स्ट जनरेशन के सीरीज 1.0एल डबल जेट
w इंजिन 5 स्पीड मॅन्युअल व 5 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसोबत
w मोठय़ा केबिनसोबत मिळणार, डबल एअरबॅग्स