प्रतिनिधी /बेळगाव
मराठा मंडळ संचलित शिवराज हायस्कूल राकसकोप-यळेबैल येथे आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना मराठा को-ऑप बँक बेळगाव यांच्याकडून गणवेश वितरण करण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. अध्यक्षस्थानी मराठा मंडळ संस्थेचे सदस्य व शिक्षणप्रेमी एन. एस. झंगरूचे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मराठा को-ऑप बँकचे चेअरमन दिगंबर पवार, संचालक बाळासाहेब काकतकर, लक्ष्मणराव होनगेकर, बी. एस. पाटील, विनोद हंगीरगेकर, बाळाराम पाटील, परशराम पाटील, पी. एल. डी. बँकचे सदस्य मनोहर बेळगावकर, बिजगर्णी ग्राम पंचायतच्या अध्यक्षा गायत्री सुतार, ग्रा. पं. सदस्य मारुती पाटील, शेतकरी गुंडू बेळवटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ईशस्तवन व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सरस्वती प्रतिमेचे पूजन एन. एस. झंगरूचे, दिगंबर पवार यांनी केले.
प्रास्ताविक व उपस्थित पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापक एम. पी. पाटील यांनी केले. पाहुण्यांच्या हस्ते इयत्ता आठवी, नववीच्या विद्यार्थ्यांना मराठा को-ऑप बँकतर्फे चेअरमन दिगंबर पवार व संचालकांच्या हस्ते गणवेशाचे वितरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांचा गौरव
दहावी परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या सारिका हणमंत केसरकर, लक्ष्मी हणमंत यळ्ळूरकर, आदित्य शिवाजी कंग्राळकर, सोमनाथ शांताराम पाटील या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी राकसकोप, यळेबैलचे ग्रामस्थ, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. एम. शिंदे यांनी केले. सी. एम. पाटील यांनी आभार मानले.