वार्ताहर /हिंडलगा
मंडोळी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित मंडोळी हायस्कूल येथे बेळगुंदी विभागीय क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ झाला. अध्यक्षस्थानी डी. एल. आंबेवाडीकर होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने झाली. त्यानंतर लक्ष्मण नावगेकर यांच्या हस्ते महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले प्रतिमेचे पूजन झाले. शाळेचे मुख्याध्यापक जी. पी. मिसाळे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. एम. के. पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. क्रीडा ध्वजारोहण वेदान्त कॅशुचे, वाय. बी. नावगेकर यांनी केले. क्रीडाज्योत स्वागत अभियंते सोमनाथ बंडू आंबेवाडीकर व क्रीडा साहित्याचे पूजन दलित संघटना राज्याध्यक्ष संतोष तळवारकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख वक्ते द. म. शि. मंडळाचे संचालक पी. पी. बेळगावकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उदघाटन कॉन्ट्रक्टर अमरनाथ फगरे यांच्या हस्ते करण्यात आले. केदारी कणबरकर, सचिन दळवी, परशराम हुंदरे यांच्या हस्ते खो-खो व
व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धा शपथविधी शंकर कंग्राळकर, नारायण शिंदे व संचिता गडकरी यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य यल्लाप्पा कणबरकर, कलावती निंबाळकर, लक्ष्मी कणबरकर यांच्यासह सर्व शाळांचे शिक्षक वर्ग, कर्मचारी, शिक्षणप्रेमी, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. एन. बेळगुंदकर यांनी केले. पी. पी. गोरल यानी आभार मानले.