बेळगाव / प्रतिनिधी :
उद्यमबाग येथे शनिवारी जंगली घोरपड आढळून आले आहे. वनाधिकाऱ्यांनी त्याला पकडल्यानंतर सुरक्षित जंगलात सोडले. उद्यमबाग परिसरात घोरपड दिसल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी वन अधिकाऱ्यांना दिली होती. त्यानुसार या माहितीच्या आधारे वन अधिकारी रमेश गिरियापन्नवर आणि मोहम्मद किल्लेदार यांनी घटनास्थळी भेट दिली. सुमारे दीड फूट लांबीचे ती जंगली घोरपड होती. नंतर धामणे येथील जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.