आरोस / वार्ताहर-
आरोस विद्या विहार मध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप सामाजिक कार्यकर्त्या सारिका श्रीकृष्ण पुनाळेकर यांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व ४० विद्यार्थ्यांना गणवेश कापड वाटप करण्यात आले. तसेच दहावी व बारावी प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम पारितोषिक व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी ,संस्थेच्या वतीने सावंतवाडी येथील टीम शिवाजी फिटनेस सेंटरचे शिवाजी जाधव यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला