तीन रंगामध्ये उपलब्ध होणार दुचाकी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हेंडा मोटरसायकल ऍण्ड स्कूटर इंडिया (एचएमएसआय) यांनी होंडा ऍक्टिव्हा प्रीमियम आवृत्ती नुकतीच सादर केली आहे. प्रीमियम आवृत्ती तीन कलरमध्ये उपलब्ध होणार आहे. आता ऍक्टिव्हाला स्टॅण्डर्ड होंडा ऍक्टिव्हा, हेंडा ऍक्टिव्हा 125 आणि होंडा ऍक्टिव्हा प्रीमियममध्ये खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
सदरच्या दुचाकीची किमत ही एक्सशोरुम 75,400 रुपये तर ऍक्टिव्हा डीएलएस मॉडेलपेक्षा 1000 रुपयांनी महाग राहणार असल्याची माहिती आहे.
ऍक्टिव्हा प्रीमियम आवृत्तीमध्ये गोल्डन व्हील्ससोबत 3 डी गोल्ड कोट एम्बलम आणि ब्राउन कलर इनर बॉडी व सीट कव्हर दिले जाणार आहे.
गाडीचे फिचर्स
w 109.5 सीसी क्षमतेचे इंजिन
w 5500 आरपीएमवर 5.73 केडब्ल्यू पॉवर
w वजन 106 किलोग्रॅम
w 5.3 लिटर इंधन टाकी
w एलइडी दिव्याची सोय
w टय़ूबलेस टायरसोबत इएसपी तंत्रज्ञानासोबतचे इंजिन
w हैड्रॉलिक शॉक ऑब्जर