नवी दिल्ली ः
भारतीयांना आता युपीआय आणि रुपे ग्राहकांसाठी लवकरच पेएक्सपर्टच्या पॉइंट ऑफ सेल उपकरणाच्या आधारे युनाइटेड किंगडममध्ये इन-स्टोर पेमेन्ट करता येणार असल्याची सुविधा मिळणार आहे. एनपीसीआय आंतरराष्ट्रीय पेमेन्ट लिमिटेड (एनआयपीएल), युनिफाइड पेमेन्ट इंटरफेस (युपीआय) आणि रुपेकार्ड स्कीम (रुपे) ब्रिटनमध्ये पेमेन्ट सोल्यूशन प्रोव्हाइडर पेएक्सपर्ट याच्यासोबत हातमिळवणी करणार असून याकरीता करार केला असल्याची माहिती आहे.
भारतीय प्रवाशांसाठी पेमेंट सुलभ होईल
पेएक्सपर्ट आणि एनपीसीआयने एक संयुक्त निवेदन जारी करत म्हटले की, दरवर्षी 5 लाखपेक्षा जास्त भारतीय यूकेमध्ये प्रवास करतात, ज्यात एक लाख विद्यार्थी आहेत. पुढील काही वर्षांत ही संख्या झपाटय़ाने वाढणार आहे. युपीआय आणि रुपे पेमेंट पर्यायांचा यूकेमधील ग्राहक आणि किरकोळ विक्रेत्यांना चांगला फायदा होईल.