नवी दिल्ली
एअरपोर्ट सेवा क्षेत्रातील कंपनी ड्रिमफोक्स सर्व्हिसेस लिमिटेडचा आयपीओ लवकरच बाजारात सादर केला जाणार आहे. सदरचा कंपनीचा आयपीओ हा 24 ऑगस्ट रोजी खुला होणार असल्याची माहिती कंपनीने यावेळी दिली आहे. 24 ऑगस्टला आयपीओ खुला होणार असून 26 ऑगस्ट रोजी बंद होणार आहे. यामध्ये गुंतवणूकदारांसाठी बोली 23 ऑगस्ट रोजी खुली होणार आहे