गुगलकडून कारवाई ः जादा व्याज, प्रोसेस फीसह अन्य अटीमुळे हा निर्णय घेतल्याची माहिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
साधारणपणे जर का कोणी ऍपचा वापर करुन वैयक्तिक कर्ज घेतल्यास किंवा कर्ज घेण्याचा विचार करत असल्यास जरा सावध राहावे लागेल. कारण गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरील भारतामधील ऍप मार्केट प्लसवर जवळपास 2,000 कर्ज ऍपवर निर्बंध लागू केले आहेत. कारण सदरच्या ऍपनी नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई केल्याची माहिती गुगलने दिली आहे.
यावेळी गुगल आशिया-पॅसिफिक विभागाचे वरीष्ठ संचालक आणि ट्रस्टऍण्ड सेफ्टीचे प्रमुख सैकत मित्रा यांनी म्हटले आहे, की ‘प्ले स्टोअर’वर सर्वात मोठय़ा प्रमाणात कर्ज ऍप्स काढून टाकण्यात आली आहेत. कारण यामधील निम्यापेक्षा अधिकची ऍप्स ही प्ले स्टोअरवर उपलब्ध नसल्याची माहिती आहे. म्हणून ही कारवाई केली आहे.
देखरेख ठेवण्यासाठी एआय मॅकेनिझम
या व्यतिरिक्त कंपनीने प्ले स्टोअर नियमांचे उल्लंघन करणाऱया लोकांवर नजर ठेवण्यासाठी गुगलने आर्टिफिशियल इंटेलिजेंस मॅकेनिझम लागू केले आहे. यातील काही गोष्टी समोर येतील, त्याच्या आधारेच सदरच्या प्ले स्टोअरवरुन ऍप्स बाजूला करण्यात आली आहेत.
प्रमाणापेक्षा अधिकचा व्याजदर
गुगलने स्पष्ट केले आहे, की प्ले स्टोअरवर जे ऍप बंद केले आहेत, त्यांनी प्रमाणापेक्षा अधिकचा व्याजदर लागू केला असून उच्चांकी प्रोसेस फीसह कर्जे दिली आहेत, असे दिसून आले आहे. आता काही नियम व मापदंड यापुढे निश्चित करण्यात येणार आहेत.