अहमदाबाद महापालिकेच्यावतीने साबरमती नदीवर निर्मिती
अहमदाबाद / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी गुजरातमधील अहमदाबाद येथे साबरमती नदीवरील पादचाऱयांसाठी बांधण्यात आलेल्या ‘अटल पुला’चे उद्घाटन केले. गेल्या बऱयाच दिवसांपासून हा पूल त्याच्या खास वैशिष्टय़ांमुळे चर्चेत आहे. हा पूल बांधण्यासाठी सुमारे 2,600 मेट्रिक टन स्टील पाईप वापरण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदींच्या दोन दिवशीय दौऱयादरम्यान या पुलाचे शनिवारी सायंकाळी लोकार्पण करण्यात आले.
आकर्षक डिझाईन आणि एलईडी लाइटिंगने सुसज्ज असलेला हा पूल सुमारे 300 मीटर लांब आणि 14 मीटर रुंद आहे. हा पूल नदीच्या समोरच्या पश्चिमेकडील फ्लॉवर गार्डन आणि पूर्वेकडील कला आणि संस्कृती केंद्राला जोडतो. पादचाऱयांशिवाय सायकलस्वारही नदी ओलांडण्यासाठी या पुलाचा वापर करू शकतात. या पुलाच्या बांधकामात रेलिंगसाठी काच आणि स्टीलचा वापर करण्यात आला आहे. एलईडीमुळे हा पूल रात्रीच्यावेळी अत्यंत आकर्षक दिसतो. याची अनेक छायाचित्रेही समोर आली आहेत. हा पूल दिसायला पतंगासारखा आहे. त्यातील पाईप जोडण्याच्या विशिष्ट प्रणालीमुळे आतील भागातून पतंगाची रचना दिसते.
74 कोटी खर्चून निर्मिती
अहमदाबाद महापालिकेने हा फूट ओव्हरब्रिज बांधला आहे. पुलाची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की लोक नदीच्या खालच्या आणि वरच्या दोन्ही बाजूंनी किंवा रिव्हरप्रंट प्रोमनेडमधून पोहोचू शकतात. 300 मीटर लांबीचा हा फूट ओव्हरब्रिज 74 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. हा पूल बनवताना छोटय़ा-छोटय़ा गोष्टींचीही काळजी घेण्यात आली आहे. पुलाजवळ कॅफेटेरिया आणि आसनव्यवस्था चांगली करण्यात आली आहे.
पंतप्रधान दोन दिवस गुजरात दौऱयावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारपासून दोन दिवसीय गुजरात दौऱयावर आहेत. दुपारी अडीचच्या सुमारास ते अहमदाबादला पोहोचले. अहमदाबादहून ते थेट गांधीनगर येथील राजभवनात गेले. यानंतर सायंकाळी त्यांनी साबरमती नदीवरील नवीन फूटओव्हर ‘अटल ब्रिज’चे उद्घाटन केले. या कार्यक्रमानंतर त्यांनी तेथेच आयोजित ‘खादी उत्सव’ कार्यक्रमाला संबोधित केले. ‘खादी उत्सव’मध्ये गुजरातमधील विविध जिल्हय़ांतील 7,500 महिला खादी कामगारांनी एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी चरखा चालवला. या कार्यक्रमात 1920 पासून वापरात असलेल्या विविध पिढय़ांमधील 22 चरख्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. रविवार, 28 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी कच्छ जिह्याचा दौरा करणार आहेत. येथे ते ‘स्मृती वन’सह विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.