चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
क्रिकेटच्या मैदानात नाव कमाविल्यावर इरफान पठाण आता अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पणासाठी सज्ज आहे. इरफान हा अजय ज्ञानमुथु यांच्याकडून दिग्दर्शित तमिळ चित्रपट ‘कोब्रा’द्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटात इरफान हा एका पोलीस अधिकाऱयाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 31 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.
ट्रेलरमध्ये इरफान हातात बंदूक घेऊन उभा असल्याचे दिसून येते. इरफानने ट्विटरवर स्वतःच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. सुरेश रैनाने इन्स्टाग्रामवर चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत स्वतःची उत्सुकता जाहीर केली आहे.
इरफानसोबत तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार चियान विक्रम या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. विक्रम यात एक गणितज्ञाची भूमिका साकारत आहे. चित्रपटाला ए.आर. रहमान यांचे संगीत लाभले आहे.
श्रीनिधि शेट्टीही झळकणार
कोब्रा चित्रपटात चियान विक्रमसह अली बेग, कनिह, मिरनालिनी रवि, मीनाक्षी आणि के.एस. रविकुमार हे चित्रपटात सहाय्यक भूमिकांमध्ये दिसून येतील.