प्रतिनिधी /कुडचडे
कुडचडे येथील दयानंद कला केंद्रातर्फे नि÷ावंत सभासदाच्या कौतुकास्पद कार्य प्रणालीनिमित्त ’त्रिवेणी सोहळा’ येथिल कुडचडे – काकोडा नगरपालिकेच्या नवीन संकुलातील परिषदगृहात उत्साहात पार पडला.
ह्या अभिनंदन, स्वागत, शुभेच्छा देण्याच्या सोहळय़ास प्रमुख पाहुणे सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल होते. अध्यक्षस्थानी कुडचडेच्या पहिल्या नागरिक नगराध्यक्ष डॉ. जेस्मीन ब्रागांझा होत्या. समारंभात मोर्तृ नाईक याच्या अध्यक्षतेखाली निवडून आलेल्या आलेल्या व नव्याने केंद्रात प्रवेश केलेल्या युवा सदस्यांचे डॉ. ब्रागांजा हिच्या हस्ते तिरंगा बॅच लावून स्वागत करण्यात आले. केंद्राची पन्नास वर्षाची परंपरा व विश्वास दर्शविण्याच्या फलकाचे अनावरणही यावेळी करण्यात आले. भारत आपला स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे आणि ह्या वर्षात होणा-या त्रिवेणी कौतुक सोहाळय़ाच्या सजावटीत तिरंगी रंगाचा वापरही जास्त प्रमाणात करण्यात आला होता.
सुरवातीस अध्यक्ष मोतू नाईक यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी पाहण्याच्या हस्ते शिरफोड – कुडचडे येथिल धालो मांडातील पथक प्रमुख संतोष गोपी नाईक याच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षणार्थी सहर्ष नाईक, संकल्प नाईक, संजोत नाईक, श्रेया नाईक, मनीष नाईक आणि गौरीष खांडेकर, कांचना नाईक, वृत नाईक, साईश उडेलकर इत्यादींना संस्थेचे सभासद करण्यात आले. ह्या छानदार कौतुक सोहळय़ास ज्ये÷ नागरिक लक्ष्मणभाऊ मडगावकर, बांदेकर ग्रुपचे मालक सुदेश बांदेकर/ पर्यटन महामंडळाचे माजी संचालक केशव नाईक, कलाकार जयकुमार खांडेकर जन उत्कर्ष शिक्षण संस्थेचे सचिव ऍड. विश्वास नाईक याची खास उपस्थिती लाभली. शेवटी ज्ये÷ सदस्य ज्ञानेश्वर नाईक यांनी उपस्थितांचे व कार्यक्रमास योगदान दिलेल्या संस्था सदस्य पत्रकार व पाहुण्याचे आभार मानले. बंटी उडेलकर यांनी सुत्रसंचलन केले.