प्रतिनिधी, इस्लामपूर
पुणे-बेंगलोर अशियाई महामार्गावर पेठनाका येथे एका सेंट्रोकारमध्ये एकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे. शिवानंद बोरगले (बेळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,
बोरगले हा इस्लामपूर येथील एका बांधकाम व्यावसायकाकडे कामास होता. गेल्या सात-आठ दिवसापुर्वी तो सुट्टीला गावी जातो म्हणून गेला तो परत आलाच नाही. बोरगलेचा मृत्यू होवून ४ ते ५ दिवस झाले असल्याचे समजते. दुर्गंधी येवू लागल्याने परिसरातील लोकांनी पोलीसांना माहिती देताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. नेमका मृत्यू कशामुळे झाला हे उत्तरीय तपासणीनंतर समोर येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.