प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव विमानतळ आता महत्त्वाचे विमानतळ ठरत असून लवकरच या ठिकाणी वैमानिक प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. दिवंगत खासदार व माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश अंगडी यांचे हे स्वप्न होते. या केंद्रामध्ये व्यावसायिक वैमानिक परवाना घेऊ इच्छिणाऱया युवकांना सहा महिन्यांचे वैमानिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.
खासदार मंगला अंगडी यांनी गुरुवारी सांबरा येथील विमानतळाला भेट देऊन त्याबाबत अधिकाऱयांशी चर्चा केली. तसेच केंद्र उभारणीच्या कामाची माहिती करून घेतली. बेळगाव-बेंगळूर विमानसेवा सप्टेंबर अखेरपर्यंत सुरू होणार असल्याची माहितीही इंडिगो एअरलाईन्सच्या अधिकाऱयांनी दिली. यावेळी विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य व त्यांचे सहकारी उपस्थित होते.