करमाळा प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी तथा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख म्हणून निवड झाल्याबद्दल करमाळ्याचे सुपुत्र मंगेश चिवटे यांचा भव्य नागरिक सत्कार मंगळवार दि ६ सप्टेंबर सायंकाळी 4 वाजता विकी मंगल कार्यालय करमाळा येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी माजी मंत्री बच्चू कडू, माजी मंत्री राजेश यड्रावकर , शिवसेना नेते प्रा शिवाजीराव सावंत, माजी आ नारायण पाटील, शिवसेना नेते रश्मी बागल यांच्या शुभ हस्ते हा सत्कार होणार आहे.
मंगेश चिवटे यांनी गेली पाच वर्षात आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची निर्मिती केली होती. या माध्यमातून महाराष्ट्रातल्या अनेक रुग्णांना फायदा झाला होता. त्याच धर्तीवर २०१९ मध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची निर्मिती करून या संघटनेचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण करून आरोग्य सेवा सुदृढ करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेली पाच वर्षापासून ते कार्यरत असून खा श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे. महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी आपत्कालीन संकट आली त्या त्या ठिकाणी मदत करण्याच्या कामात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.