पौराणिक चित्ररथांनी वेधून घेतले लक्ष , स्पर्धेत टिम-45 च्या ‘इंद्रने रावण को बंदी बनाया’ हा चित्ररथ प्रथम, गोळवाडा सरस्वतीमंडळच्या‘ देव वेताळकडून मृतांना पुनर्जन्म’ चित्ररथ द्वितीय
प्रतिनिधी /कुंभारजुवे
कुंभारजुवे येथील कुंभारजुवेवासियांचे ग्रामदैवत श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवीच्या सात दिवशीय श्रीगणेशमूर्तीच्या विसर्जनानिमित्त होणाऱया प्रसिद्ध सांगडोत्सवात स्थानिक ग्रामपंचायतीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या नदीतील होडय़ांवरील चित्ररथ स्पर्धेत टिम-45 च्या ‘इंद्रने रावण को बंदी बनाय’ चित्ररथास प्रथम क्रमांकाचे रोख वीस हजार रू. चषक व गॏरेश तारी पुरस्कृत फिरता चषक बक्षीस प्राप्त झाले.
सविस्तर निकाल पुढील प्रमाणे आहे.
ध्दतीय बक्षीस रोख रू. पंधरा हजार. सार्वजनिक सरस्वतीमंडळ उत्सव गोळवाडा याच्या देव वेताळ कडुन मृतांचा पुनॅजन्म.
तृतीय बक्षीस रोख रू दहा हजार. स्पाकॅलिंग स्पोर्ट्स आणि कल्चरल क्लब च्या श्रीकृष्ण बाणासुर युद्ध ला. उत्तेजनार्थ पहिले रोख रू तीन हजार. बाॅय्ाज आॅफ चिंचेश्वर च्या समुद्र मंथन ला. उत्तेजनार्थ दुसरें बक्षीस रोख रू. तीन हजार. ज्ञानगीत कला मंडळाच्या रावणाची नवग्रहावर स्वारी ला. उत्तेजनार्थ तिसरे रोख रू. तीन हजार. सरस्वती कला मंडळ च्या रावणध्दारा यमलोकाआक्रपरआक्रमण चित्ररथास मिळाले.
या स्पर्धेत एकूण 18 स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेचे परिक्षक म्हणून प्रसिद्ध चित्रकार प्रणय नाईक, सुनील नाईक, समीर नाईक यांनी काम पाहिले.
बक्षीस वितरण प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई, खास निमंत्रित म्हणून उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक, डेक्कन फाईन केमिकल खोलीॅच्ाs सीएसआर व्यवस्थापक गॏरव कुडचडकर, स्थानिक सरपंच कृष्णा परब उपसरपंच सचिन गावडे, पंच सदस्य सुधीर फडके, अचानक परब, सुरेश नाईक, अनुज नाईक, नंदकुमार शेट, शेजल नावेॅकर, विंदा जोशी परिक्षक प्रविण नाईक, सुनील नाईक, समीर नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांचे सुर्यकांत गावडे, सुधीर फडते, सचिन गावडे, सुरेश नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले
स्वागत पर बोलताना सरपंच कृष्णा परब यांनी सांगडोत्सव आमची पुर्वजांची परंपरा आहे. ती जपण्यासाठी आम्ही पुर्ण सहकार्य करीन त्याचबरोबर इतर लोकोपयोगी कामांसाठी सहकार्य करू असे आश्वासन दिले.
कुंभारजुवेचा सांगडोत्सव आगळा वेगळा असुन गोवाभर प्रसिद्ध आहे. इथे कलाकारांची खाण आहे. अप्रतिम कलेध्दारे लोकांना आनंद देणारा हा सांगडोत्सव येत्या वषीॅ शासनांतफेॅ राज्य स्तरावर तो साजरा करीन व यासाठी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत याच्याशी बोलणार आहे. असे आश्वासन स्थानिक आमदार राजेश फळदेसाई यानी यावेळी दिले.
याप्रसंगी गॏरव कुडचडकर, सिध्देश नाईक यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार माजी पंच सदस्य प्रशांत भांडारी यांनी मानले.