आज सत्यनारायण महापूजा-महाप्रसादाचे आयोजन
वार्ताहर /जांबोटी
ओलमणी (ता. खानापूर) येथे ‘एक गाव एक गणपती’ परंपरा अद्याप कायम असून गेल्या 60 वर्षापासून या गावाने ही परंपरा जोपासली आहे.
सुमारे 3000 लोकसंख्या असलेला ओलमणी गाव राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सहकारक्षेत्रात अग्रेसर आहे. गावात विविध राजकीय पक्षांचे व विभिन्न विचारसरणीचे कार्यकर्ते आहेत. मात्र गावातील सण उत्सव परंपरेनुसार गुण्यागोविंदाने एकत्र येऊन साजरे करतात. गेल्या 60 वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. यापूर्वी गावच्या मध्यवर्ती ठिकाणी मारुती मंदिरमध्ये गणेशोत्सवाला प्रारंभ केला. यानंतर पंचमंडळींनी दरवषी एका गल्लीत गणेशोत्सव साजरा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. ती परंपरा आजही कायम आहे. यावषी पांडुरंग गल्ली यांच्यामार्फत गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. केदारनाथ मंदिराच्या प्रतिकृतीचा आकर्षक देखावा सादर करण्यात आला आहे.
आज सत्यनारायण महापूजा -महाप्रसाद
कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्ष गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. मात्र यावषी पांडुरंग गल्ली यांच्यातर्फे गुरुवार दि. 8 रोजी दुपारी 12-30 वाजता सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ओलमणी ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.