टेम्पो ट्रव्हलर कोसळली दरीत ः जखमींमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश
वृत्तसंस्था / कुल्लू
हिमाचल प्रदेशच्या कुल्लूमध्ये रविवारी रात्री झालेल्या दुर्घटनेत 7 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. चालकाने नियंत्रण गमावल्याने टेम्पो ट्रव्हलर खोल दरीत कोसळली आहे. दुर्घटनेचा आवाज ऐकून परिसरातील लोकांनी तेथे धाव घेत प्रशासनाला कल्पना दिली होती. मृतांमध्ये 5 पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये आयआयटी बीएचयूचे 3 विद्यार्थी सामील असल्याचे समजते. या विद्यार्थ्यांचे कुटुंबीय उत्तरप्रदेशातून कुल्लूला पोहोचले आहेत.