केरी भागात मोठय़ा प्रमाणात वाहने अडकली, तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्मयता, जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाची अंमलबजावणी,
प्रतिनिधी /वाळपई
गोवा-बेळगाव दरम्यानच्या चोर्ला घाट महामार्गावरून अवजड वाहनांना जिल्हाधिकाऱयांनी बंदी आदेश जारी केला होता. त्यानुसार सोमवार सकाळपासून वाहतूक खात्याच्या अधिकाऱयांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला आहे. सोमवारी सकाळपासून चोर्ला घाट परिसरातील गोवा हद्दीमध्ये मोठय़ा प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. केरी येथे अनेक वाहने रस्त्याच्या बाजूला उभी करून ठेवण्यात आली आहेत. रात्रीपर्यंत ही वाहने न सोडल्यास बेळगाव भागातून येणारी भाजी व दुधाची वाहने अडवून ठेवणार असल्याचा इशारा ट्रक मालक व चालकांनी दिला आहे.
चोर्ला घाट परिसरातून अवजड वाहनांना बंदीचा आदेश जिल्हाधिकाऱयांनी आठ दिवसापूर्वी दिला होता. मात्र या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्यामुळे केरी पंचायत मंडळाने केरी येथे वाहतूक खात्याच्या अधिकाऱयांची भेट घेऊन याबाबत विचारणा केली होती. सोमवार सकाळपासून सदर आदेशाची अंमलबजावणी करताना वाहतूक खात्याच्या अधिकाऱयांनी चोर्ला भागातून गोव्यात येणाऱया अवजड वाहतुकीवर कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यांना गोवा हद्दीमध्ये प्रवेश न दिल्यामुळे संध्याकाळपर्यंत शंभर पेक्षा जास्त अवजड वाहने रोखून धरलेली आहेत.
ही वाहने शिस्तीने उभी करून न ठेवल्याने इतर वाहनांना जाण्यासाठी अडचण निर्माण होत असून यावर पोलीस वाहतूक खात्याने विशेष कारवाई करणे गरजेचे होते. मात्र तशा प्रकारची कारवाई न झाल्यामुळे सध्या तरी केरी चेकपोस्टवर मोठय़ा प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. जर या वाहनांना परवानगी न दिल्यास रात्री उशिरापर्यंत तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्मयता आहे.
परवानगी नसताना वाहने कशी सोडणार : वाहतूक अधिकारी
दरम्यान या संदर्भात वाहतूक अधिकाऱयांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की जिल्हाधिकाऱयांच्या बंदी आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यांचा आदेश किंवा संबंधित खात्याच्या वरि÷ अधिकाऱयांची सूचना येत नाही तोपर्यंत वाहने सोडणे शक्मय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
अवजड वाहने सोडण्यात येत नाही तोपर्यंत बेळगाव भागातून गोव्याकडे येणारी भाजी व दुधाची वाहने अडवून ठेवण्याचा इशारा अवजड वाहनधारकांनी दिलेला आहे. परंतु तसे झाल्यास गोवा हद्दीमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्मयता आहे.
तर गोव्याची वाहने बेळगाव भागात रोखणार
दरम्यान मिळालेल्या अधिक माहितीनुसार गोव्यातून बेळगाव भागाकडे जाणारी वाहने व बेळगाव भागातून गोव्याकडे येणारी वाहने गोवा हद्दीमध्ये अडवून ठेवण्यात आल्यामुळे बेळगाव भागात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. गोवा वाहतूक खात्याने ही कारवाई न थांबविल्यास गोव्यातून बेळगाव भागाकडे होणारी वाहतूक अडविण्यात येणार असल्याचा इशारा बेळगाव भागातील वाहनधारकांनी दिला आहे.
तर आम्हाला रस्ता कुठला : वाहनधारकांचा सवाल
गोवा व बेळगाव या दरम्यान एकूण तीन महामार्ग आहेत. यामध्ये चोर्ला, अनमोड व आंबोली यांचा समावेश आहे. सध्या अनमोड मार्ग अवजड वाहतुकीला बंद केलेला आहे. आता चोर्ला मार्गे वाहतूक बंद केल्यास या अवजड वाहनधारकांना आंबोली मार्गे बेळगावला जावे लागणार आहे. यामुळे 160 किलोमीटरचे अंतर कापावे लागणार असून मोठी अडचण निर्माण होणार असल्याच्या प्रतिक्रिया अवजड वाहनधारकांनी व्यक्त केलेल्या आहेत.