पशुपालकांची मागणी : महाराष्ट्राप्रमाणे भरपाईची अपेक्षा, पशुपालकांना लाखेंचा फटका
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हय़ात लम्पिस्कीनची लागण झपाटय़ाने होत असल्याने दगावणाऱया जनावरांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पशुपालकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. लम्पीने दगाविलेल्या जनावरांना तात्काळ महाराष्ट्र राज्याप्रमाणे भरपाई द्यावी, अशी मागणी पशुपालकांतून जोर धरून आहे.
महाराष्ट्र शासनाने लम्पीच्या संसर्गाने जनावर दगावल्यास आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे. गाय, म्हैस, बैल, वासरू अशा वर्गवारीनुसार संबंधित पशुपालकास 16 ते 30 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. मात्र अद्याप कर्नाटकात कोणतीही नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे पशुपालक चिंतेत सापडले आहेत. यासाठी महाराष्ट्र शासनाप्रमाणे कर्नाटकातदेखील लम्पीने दगाविलेल्या जनावरांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी संबंधित पशुपालकांतून होत आहे.
बेळगाव आणि सौंदत्ती तालुक्मयात लम्पीचा प्रादुर्भाव अधिक वाढला आहे. त्यामुळे आतापर्यंत एका बेळगाव तालुक्मयात 800 हून अधिक जनावरांना या रोगाची लागण झाली आहे. तर 40 हून अधिक जनावरे दगाविली आहेत. त्यामुळे पशुपालकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. दगावलेल्या जनावरांमध्ये गाय व बैलांचा समावेश अधिक आहे. तर काही ठिकाणी शर्यतींच्या बैलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा फटका बसला आहे. तर काही शेतकऱयांची बैलजोडीच मृत्युमुखी पडली आहे. शेती कशी करावी, असा प्रश्न शेतकऱयांसमोर उभा ठाकला आहे. अशा परिस्थितीत जनावरे दगाविलेल्या पशुपालकांना भरपाई मिळणे आवश्यक
आहे. लम्पीची लागण जिल्हय़ातील बेळगाव तालुक्मयामध्ये सर्वाधिक झाली आहे. त्यामुळे दगाविलेल्या जनावरांची संख्याही तालुक्मयात अधिक आहे. आतापर्यंत पूर्व भागातील जनावरे अधिक मृत्युमुखी पडली आहेत. दरम्यान दगाविलेल्या जनावरांचा तात्काळ सर्व्हे करून शासनाने आर्थिक भरपाई जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.
लम्पी हा धोकादायक संसर्गजन्य रोग आहे. दीड महिन्यापूर्वी या रोगाचा शिरकाव तालुक्मयात झाला होता. मात्र आता सर्वत्र या रोगाची जनावरांना लागण होत आहे. गतवषीदेखील या रोगाची लागण झाली होती. मात्र यंदा रोगाची तीव्रता अधिक असल्याने मरतुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पशुपालकांसमोर धास्ती निर्माण झाली आहे. दरम्यान, रोग नियंत्रणात आणण्यासाठी लम्पी प्रतिबंधक गोटपॉक्स लसीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र लागण झालेल्या जनावरांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे रोगावर नियंत्रण आणण्यासाठी बेंगळूर येथील जैवविज्ञान प्रयोग शाळेतील पथक बेळगावात दाखल झाले आहे. दरम्यान, या पथकाने लागण झालेल्या आणि दगाविलेल्या जनावरांची पाहणी करून पशुपालकांना आणि पशुवैद्यकीय अधिकाऱयांशी सविस्तर चर्चा केली आहे. मात्र दगाविलेल्या जनावरांना आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे.
मदतीसाठी शासन दरबारी प्रयत्न होणार
लागण झालेल्या आणि दगाविलेल्या जनावरांची नोंद खात्याने केली आहे. शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. जनावरे दगाविलेल्या शेतकऱयांना फटका बसला आहे. आर्थिक मदत मिळण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न होणार आहेत.
डॉ. राजीव कुलेर (सहसंचालक पशुसंगोपन खाते)
बेंगळूरच्या पथकाची लम्पीग्रस्त भागाला भेट
आढाव्यासह तपासणीसाठी घेतले रक्ताचे नमुने
बेळगाव तालुक्मयात लम्पिस्कीनचा प्रादुर्भाव वाढल्याने हजारो जनावरांना लागण झाली तर शेकडो जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. या पार्श्वभूमीवर बेंगळूर येथील भारतीय पशु आरोग्य आणि जैविक संस्थेच्या तज्ञ पथकाने बेळगावला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मंगळवारी या पथकाने लम्पीग्रस्त भागाला भेट देऊन जनावरांची पाहणी केली. दगाविलेल्या जनावरांच्या रक्ताचे नमुने घेतले.
बेळगाव व सौंदत्ती तालुक्मयात लम्पीचा धोका वाढला आहे. एका बेळगाव तालुक्मयात 800 हून अधिक जनावरांना लागण झाली आहे. तर 40 हून अधिक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. त्यामुळे शेतकऱयांच्या चिंतेत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर बेंगळूर येथील तज्ञ पथकाने लम्पीग्रस्त खनगावाला भेट देऊन लागण झालेल्या जनावरांची पाहणी केली. शिवाय दगाविलेल्या जनावरांचे शवविच्छेदन करून पुढील तपासणीसाठी रक्ताचे नमुने घेतले.
जिल्हय़ात आतापर्यंत केवळ बेळगाव तालुक्मयात लम्पीचा संसर्ग अधिक वाढला आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. बेंगळूर येथील भारतीय पशु आरोग्य व जैविक संस्थेच्या तज्ञ पथकाने पशुवैद्यकीय अधिकाऱयांना रोग आटोक्मयात आणण्यासाठी मार्गदर्शन केले. शिवाय लम्पी प्रतिबंधक लसीकरण आणि तात्काळ उपचाराबाबत पशुसंगोपनने चालविलेल्या कार्याविषयी समाधान व्यक्त केले. सदर रक्ताच्या नमुन्यांचे प्रयोगशाळेत संशोधन करून लवकरच अहवाल बेळगावला पाठविला जाईल, असेही पथकाने स्पष्ट केले आहे. यावेळी खनगाव येथील पशुपालक नागेश पाटील यांच्याही बैलाचा मृत्यू झाला असून त्यांनी पथकाला सहकार्य केले.
या पथकात डॉ. श्रीपाद, विषाणू तज्ञ संजीव कुमार, सहसंचालक डॉ. राजीव कुलेर, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद पाटील, डॉ. प्रताप हन्नूरकर, डॉ. विठ्ठल संगनट्टी, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. आरगंजी, डॉ. चंद्रू, डॉ. तळवार यासह ग्रामस्थ उपस्थित होते.