वार्ताहर /किणये
तालुक्मयात दुर्गामाता दौडला शुक्रवारी पाचव्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. विविध गावांमध्ये होत असलेल्या दुर्गामाता दौडमध्ये तरुणी व तरुणांचा सहभाग वाढलेला दिसून येत आहे. तालुक्मयाच्या सर्रास गावांमध्ये दुर्गामाता दौड काढण्यात येत असून या दौडच्या माध्यमातून तरुणवर्ग एकत्र आल्याचे निदर्शनास येत आहे.
खादरवाडी गावात शुक्रवारी काढण्यात आलेल्या दुर्गामाता दौडमध्ये तरुण व तरुणींसह बालचमूंचा लक्षणीय सहभाग दिसून आला. शुक्रवारी पहाटे गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन, शस्त्र व ध्वजपूजन करण्यात आले. त्यानंतर प्रेरणामंत्र म्हणून दुर्गामाता दौडला सुरुवात करण्यात आली. गावातील संपूर्ण गल्ल्यांमध्ये ही दुर्गामाता दौड निघाली. प्रत्येक गल्लीमध्ये रांगोळय़ा काढण्यात आल्या होत्या. महिला आरती ओवाळून स्वागत करीत होत्या.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजा अशा घोषणा कार्यकर्ते देत होते. गणपत गल्ली येथील विठ्ठल रखुमाई मंदिर येथे शुक्रवारच्या दौडची सांगता करण्यात आली.