खेमेवाडी मराठी शाळा एसडीएमसी-पंच कमिटीतर्फे गटशिक्षणाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तालुक्मयातील खेमेवाडी येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक अजय काळे यांची बदली करण्यात यावी या मागणीसाठी खेमेवाडी शाळा सुधारणा समिती पालक तसेच पंच कमिटीतर्फे खानापूर तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालयात दोन तास ठिय्या आंदोलन करून बदलीच्या मागणीचे निवेदन गटशिक्षणाधिकारी राजेश्वरी कुडची यांना दिले.
यावेळी एसडीएमसी कमिटी व पालक वर्गाने अजय काळे यांच्या वर्तणुकीबद्दल अनेक तक्रारी राजेश्वरी कुडची यांच्याकडे केल्या. गेल्या दोन वर्षापासून अजय काळे हे विद्यार्थ्यांना सातत्याने मारबडव करत आहेत. त्यामुळे या शिक्षकाबद्दल विद्यार्थ्यांत भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी दुसऱया गावच्या शाळेत जात आहेत. याचा परिणाम पटसंख्येवर झाला आहे. विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याने शाळा बंद होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. काळे यांची वर्तणूक शिक्षकाला शोभेल असे नाही. यासाठी या शिक्षकाची त्वरित बदली करावी, अन्यथा सुटी संपल्यानंतर शाळेला टाळे ठोकण्यात येतील असा इशाराही यावेळी ग्रामस्थांनी दिला
कारवाई करण्याचे आश्वासन
यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष हुवाप्पा येळ्ळूरकर, परशराम चोपडे, पल्लवी चोपडे, विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील, हणमंत खाबले, यशवंत खांबले, भोमाणी यळ्ळूरकर, कृष्णा कुंभार, बाळू चोपडे, मल्हारी गणेबैलकर, विष्णू खांबले, लक्ष्मी सावंत, माधुरी खांबले, पूजा चोपडे, निलम खांबले, लीला गणेबैलकर यासह मोठय़ा संख्येने पालक, ग्रामस्थ पंचमंडळी उपस्थित होती. गटशिक्षणाधिकारी कुडची यांनी निवेदनाचा स्वीकार करून आपण योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले.