प्रतिनिधी/ बेळगाव
श्रावण महिन्यापासून सुरू झालेला सणांचा झगमगाट अगदी दीपावलीपर्यंत उजळून निघतो. हे सण-वार आपल्याला जगण्याची नवी उर्मी देतात, नवी प्रेरणा देतात. हे सण-वार गुंतवणुकीच्या माध्यमातून अधिक संस्मरणीय करण्याच्यादृष्टीने ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.’ने ‘शुभदीप’ व ‘शुभपर्व’ या दोन ठेव योजना सादर केल्या आहेत.
शुभपर्व या गुंतवणूक योजनेत ग्राहक व सभासदांना गुंतवणुकीवर 9 टक्के इतका व्याजदर मिळणार असून सदर योजनेचा कालावधी 27 महिने आहे. शुभदीप या गुंतवणूक योजनेत ग्राहक व सभासदांना गुंतवणुकीवर 8.75 टक्के इतका व्याजदर मिळणार आहे. सदर योजना 15 महिन्यांसाठी आहे. ग्राहक, सभासद दोन्ही योजनेत रु. 10,000 व अधिकची गुंतवणूक करू शकतात. वरील दोन्ही योजना 31 डिसेंबर 2022 पर्यंतच सुरू असणार आहेत.
गुंतवणूकदार घरबसल्या ‘डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून (www.lokmanyaonline.com) देखील या योजनेमध्ये पैसे गुंतवू शकतात. ‘लोकमान्य सोसायटी’च्या कोणत्याही शाखेत किंवा 1800 212 4050 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून ठेवीदार, सभासद, गुंतवणूकदारांना या योजनेचा लाभ घेता येईल, अशी माहिती ‘लोकमान्य सोसायटी’तर्फे देण्यात आली.