Decision on Gangaram Shelke’s appeal today
सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक 12 नोव्हेंबरला होत आहे.निवडणुकीसाठी विमुक्त जाती ,भटक्या जमाती गटामधून गंगाराम शेळके यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु त्यांचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यानी अवैध ठरवला. या संदर्भात शेळके यांनी जिल्हा सहकार निबंधकांकडे अपील केले आहे .यासंदर्भात आज गुरुवारी निर्णय होणार आहे .ते खरेदी-विक्री संघाचे सभासद नसल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी अवैध ठरवला होता या संदर्भात शेळके यांनी जिल्हा सहकार निबंधकाकडे अपील केले आहे .त्यावर आज सुनावणी होऊन निर्णय होणार आहे .शेळके महाविकास आघाडीचे उमेदवार असून त्यांचा उमेदवारी अर्ज अपात्र ठरल्यास भाजपा शिंदे गटाचे दत्ताराम कोळमेकर हे बिनविरोध निवडून येणार आहेत .
शेळके हे आजगाव सोसायटीचे संचालक आहेत खरेदी विक्री संघाची ही संस्था संलग्न असल्याने नियमानुसार ते निवडणूक लढू शकतात. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळणे चुकीचे असल्याचे महाविकास आघाडीचे विद्यमान खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष अरुण गावडे यांनी स्पष्ट केले .शेळके यांच्यावर अन्याय झाला आहे तो अपिलात दूर होईल असे गावडे यानी स्पष्ट केले ज्या कारणावरून शेळके यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला त्यानुसारच यापूर्वी कोळमेकर निवडून आले होते. तालुका खरेदी विक्री संघावर शिवसेना ठाकरे गट सत्तेवर येणार असल्याची खात्री झाल्याने भाजप- शिंदे गट रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप गावडे यांनी केला आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी