दोन वर्षांपासून समस्या : नागरिकांचे आरोग्य धोक्यात
प्रतिनिधी /बेळगाव
शहापूर येथील कोरे गल्ली, जेड गल्ली परिसरात मागील दोन वर्षांपासून डेनेज भरले आहेत. डेनेजची वेळच्या वेळी स्वच्छता होत नसल्यामुळे आजुबाजुच्या विहिरींचे पाणी दूषित झाले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आल्याने महानगरपालिकेच्या कारभारा विरोधात संताप व्यक्त होत आहे.
वेळच्या वेळी डेनेजची स्वच्छता होत नसल्याने शहापूर परिसरात अनेक ठिकाणी चेंबरमधून ड्रेनेजचे पाणी वाहताना दिसत आहे. दू†िषत पाणी आजुबाजुच्या विहिरींमध्ये झिरपत आहे. यामुळे विहिरींचे पाणी काळे होत असून, त्याला दुर्गंधी येत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विहिरींचे पाणी दूषित होत असून, यामुळे रोगराईचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे याची दखल घेऊन डेनेजची स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.