आमदार विजय सरदेसाई यांचे आमदार दिगंबर कामत यांना आव्हान : मडगाव व फातोर्डाच्या विकासावरही जाहीर चर्चा करूया
प्रतिनिधी /मडगाव
भाजपात उडी मारलेले आमदार दिगंबर कामत यांनी आता दुसऱयांवर बोटे उगारू नयेत. तसेच सोनसडा व अन्य प्रश्नांवर माझी बुद्धी आणि माहिती यावर शंका घेण्याची गरज नाही. सोनसडय़ासंदर्भात कोणत्याही व्यासपीठावर कामत यांच्याशी चर्चा करण्यास मी तयार असून त्यांनी हे आव्हान स्वीकारावे, अशी तीव्र प्रतिक्रिया फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे. सोनसडय़ासह गेल्या 15 वर्षांत फातोर्डात काय विकास झाला आहे व मडगावात काय विकास झाला आहे, तोही आमदार कामत हे मुख्यमंत्री राहिलेले असताना, यावर जाहीर चर्चा करूया, असेही आव्हान आमदार सरदेसाई यांनी कामत यांना दिले आहे.
आमदार सरदेसाई यांना सोनसडय़ासंदर्भात योग्य माहिती नाही असे मत आमदार कामत यांनी नुकतेच व्यक्त केले होते. त्यासंदर्भात पत्रकारांनी सरदेसाई यांची प्रतिक्रिया जाणली असता ते चांगलेच भडकले व कामत यांनी भाजपात उडी घेतली म्हणून उगाच दुसऱयांना बोटे दाखवू नये, असे उद्गार त्यांनी काढले. आपण तीन वेळा फातोर्डातून आमदार बनलो आहे. सोनसडय़ाचा प्रश्न मी आमदार बनण्याच्या आधीपासूनचा आहे आणि आता काय झाले आहे त्याची मला पूर्ण कल्पना आहे तसेच सोनसडा असा राहण्यास कोण कारणीभूत आहे तेही माहीत आहे. यावर चर्चा करण्यास मी तयार आहे. पाहिजे तर मडगावात चर्चा करण्यास मी तयार आहे, असे उघड आव्हान सरदेसाई यांनी कामत यांना दिले आहे.
कोणी काय दिवे लावले ते सर्वांना माहीत
कामत हे आमदार असताना कॉमेक्स आले. नंतर ते मुख्यमंत्री बनले व फोमेन्तोला आणले. त्यावेळी कोणी काय दिवे लावले ते सर्वांना माहीत आहे. आपण नंतर आमदार बनलो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सोनसडय़ावर दैनंदिन गोळा होणारा ओला कचरा व पडून असलेला कचरा ही मुख्य समस्या आहे. पडून असलेल्या कचऱयावर प्रक्रियेसाठी आपण मंत्री असताना तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांना सोनसडय़ावर आणून बायोरेमेडिएशन मार्गी लावले. ओल्या कचऱयावर बायोमिथेनेशन प्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याने पालिकेने लिंडन पेरेरा नगराध्यक्ष असताना सोनसडा घनकचरा महामंडळाच्या ताब्यात देण्यासाठी ठराव घेतला होता. महामंडळ हीच शास्त्राsक्त पद्धतीने कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी विशेष यंत्रणा असून त्याअनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला होता, असे सरदेसाई यांनी नजरेस आणून दिले.
एक इंच तरी ‘इनर्ट’ मडगावात नेला काय ?
मडगावच्या आमदारांना कचऱयाचे काहीही पडून गेलेले नाही. त्यांच्या मतदारसंघातील कचरा सोनसडय़ावर आणला जातो आणि ही कचरा समस्या आपल्या मतदारसंघातील लोकांना सोसावी लागते. येथील विहिरींचे पाणी, भूगर्भातील पाणी प्रदूषित झाले आहे. कचऱयावर प्रक्रिया केल्यानंतर राहिलेले टाकावू इनर्ट टाकून आम्ही हॉकी मैदान तयार केले. अन्य इनर्ट एसजीपीडीए व कदंब स्थानकाच्या शेजारील जमिनीत टाकले. दिगंबर कामत यांनी एक इंच तरी इनर्ट मडगावात नेला काय हा सवाल तुम्ही त्यांना विचारा. वरून इनर्ट टाकले, तर आपले लोक आरडाओरडा करतील असे त्यांनी वेळोवेळी सांगितले, असा दावा सरदेसाई यांनी यावेळी केला.
साळगाव प्रकल्पाच्या विरोधात कामत फूस लावत होते
साळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात कचऱयावर प्रक्रिया करण्यासाठी योग्य तंत्रज्ञान नसल्याचा दावा करून आणि यावर विधानसभेत आम्हाला आवाज उठविण्यास सांगून आमदार कामत फूस लावण्याचे काम करत होते, असाही दावा आमदार सरदेसाई यांनी यावेळी केला.