विक्रीत घट, महागाईसह मंदीची चिंता
नवी दिल्ली
मेटा, ट्विटर आणि ऍमेझॉननंतर आता आणखी एक टेक कंपनी कर्मचारी कमी करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत आहेत. यामध्ये लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक हॅवलेट पॅकर्ड म्हणजे एचपी इन्क (एचपी) अंदाजे 6,000 इतक्या लोकांना कमी करण्याची शक्यता आहे. एकूण कर्मचाऱयांच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे 12 टक्के इतके आहे. सध्याच्या घडीला एचपीमध्ये 50,000 पेक्षा अधिक कर्मचारी आहेत. तथापि कंपनीकडून कपातीची योजना आगामी म्हणजे 2025 पर्यंत राबवली जाणार असल्याची माहिती आहे.
एचपीने आर्थिक वर्ष 2022 च्या पूर्ण वर्षाच्या अहवालादरम्यान ही घोषणा केली आहे. कोरोना महामारीच्या दरम्यान पीसी व लॅपटॉप यांच्या सेंगमेंटमध्ये जोरदार तेजी दिसून आली. विक्रीत झालेली घट व महागाईच्या मुद्यावर कंपनी कर्मचारी कपातीचे धोरण राबवणार आहे.