वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू तसेच ससेक्सचे अष्टपैलू ल्युक राईट यांची इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या पुरुषांच्या निवड समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. आता या निवड समितीत राईट हे नवे निवड सदस्य म्हणून कार्यरत राहतील.
विविध स्पर्धांसाठी इंग्लंडच्या वरि÷ आणि कनि÷ संघांच्या निवडीची जबाबदारी आता राईट यांच्यावर राहील. त्याचप्रमाणे प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्या निवडीची जबाबदारीही राईट आणि त्यांच्या सहकाऱयांवर राहील. अलीकडेच इंग्लंडने आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली आहे. इंग्लंडच्या क्रिकेट संघाला हा उन्हाळी क्रिकेट हंगाम खूपच यशस्वी ठरला आहे. इंग्लंडमध्ये तसेच विदेशात खेळण्याचा राईट यांना पुरेसा अनुभव असल्याने त्याचा लाभ आता इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना होणार आहे. पुढील वषी आयसीसी वनडे विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारतात होणार आहे. त्याचप्रमाणे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऍशेस मालिका खेळविली जाणार आहे. या दोन महत्त्वाच्या स्पर्धांचे राईट यांच्यासमोर मोठे आव्हान राहणार आहे. ल्युक राईट यांनी 2007 ते 2014 या सात वर्षांच्या कालावधीत शंभरपेक्षा अधिक सामन्यात इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे. 2010 साली टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱया इंग्लंड संघामध्ये राईट यांचा समावेश होता. ल्युक राईट सध्या ऑकलंड क्रिकेटशी करारबद्ध असून त्यांचा कालावधी मार्च महिन्यात संपणार आहे. इंग्लंड संघाच्या निवड सदस्यपदाची सूत्रे ते मार्चअखेरीस स्वीकारतील.