युजी चषक 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा
क्रीडाप्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित 14 वर्षाखालील मुलांच्या युजी चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत आज ठळकवाडी संघाने भातकांडे संघाचा व केंद्रीय विद्यालय 2 संघाने जैन हेरिटेजचा पराभव करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला. वेदांत पोटे ठळकवाडी, क्रिश खत्री सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
जिमखाना मैदानावर खेळविण्यात पहिल्या सामन्यात ठळकवाडी संघाने भातकांडे संघाचा 8 गड्यांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भातकांडे संघाने 23 षटकात 8 बाद 99 धावा केल्या. त्यात औदुंबर हिशोबकरने 33, गौरव गावडेने 12 धावा केल्या. ठळकवाडी तर्फे वेदांत पोटेने 3, मयूर जाधवने 2 गडीबाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना ठळकवाडी संघाने 16 षटकात 2 बाद 103 धावा करुन सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात मयूर जाधवने 30, प्रज्योत उघाडेने 32 धावा केल्या. भातकांडेतर्फे गौरव गावडेने 2 गडीबाद केले
दुसऱ्या सामन्यात केंद्रीय विद्यालय 2 संघाने जैन हेरिटेजचा 32 धावाने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना केंद्रीय विद्यालय संघाने 22.2 षटकात सर्व बाद 167 धावा केल्या. त्यात क्रिश खत्रीने 21, आर्यन मुरुडकरने 17, पवन तलवार व कुशल जमलदिनी यांनी प्रत्येकी 16 धावा केल्या. जैन हेरिटेजतर्फे सुमित पडसलगेने 3, मीर मिरजीने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना जैन हेरिटेज संघाचा डाव 22.3 षटकात सर्व बाद 129 धावा आटोपला. त्यात मिर मिरजीने 34, उत्कर्ष 19, सुमित पडसलगेने 16 धावा केल्या. केंद्रीय विद्यालय तर्फे क्रिश खत्रीने 5 बळी मिळविले.