प्रतिनिधी /बेळगाव
नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत आहेत. सर्वत्र नूतन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी चालू झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही द ऑर्चर्ड रिसॉर्ट नावगे येथे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शासत्रम रॉक बँडच्या तालावर व डीजे पेक्युलियरच्या साथीने लाईव्ह म्युझिक, नृत्य, विविध खेळ, भरपूर बक्षिसे, नेत्रदीपक फटाके व आकर्षक विद्युत रोषणाई इत्यादी अनेक गोष्टींचा आनंद अनुभवण्यास मिळणार आहे. नावगेस्थित द ऑर्चर्ड रिसॉर्ट निसर्गाच्या सानिध्यात गर्द हिरवळीत वसले असून निसर्गाचा अनोखा आविष्कार आपल्यास अनुभवण्यास मिळतो.
या कार्यक्रमाची नोंदणी चालू असून पुढील मोबाईल क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करावी. मो. क्र. 8217297900 आणि 8296318888. दि. 29 डिसेंबरपर्यंत नोंदणी करणाऱ्यांना अर्लीबर्ड ऑफर अंतर्गत प्राधान्य देण्यात येत आहे. 31 डिसेंबर रोजी संध्याकाळी 8 पासून कार्यक्रमांना सुरुवात होईल. सर्व कुटुंबीयांसमवेत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ही एक अनोखी पर्वणी आहे. बेळगावकरांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.