क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
येथील कै. चुडाप्पा हलगेकर कुस्ती प्रोत्साहन समितीची वार्षिक बैठक खेळीमेळीत पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शंकर मुचंडी हे होते.
पाटील गल्ली येथील विमल ग्रुपच्या सभागृहात या बैठकीच्या वेळी प्रारंभी अशोक हलगेकर यांनी प्रास्ताविक केले. कोरोना काळात गेली दोन वर्षे कुस्ती मैदाने खंडीत पडली. यावर्षी पुन्हा कुस्ती मैदाने जोमाने करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. यावेळी गुलाब जंगुशेख यांची कार्याध्यक्ष म्हणून फेरनिवड करण्यात आली. सल्लागार बाळाराम पाटील यांनी कुस्तीबद्दल मार्गदर्शन केले. प्रभाकर हलगेकर व आनंद जाधव यांनी यावर्षीच्या कुस्ती मैदानाबद्दल विचार मांडले. या वर्षी संघटनेला 25 वर्ष रौप्यमहोत्सवीनिमित्त भव्य कुस्ती मैदान घेण्याचे या बैठकीत निर्णय घेण्यात आला. स्थानिक मल्लांना वाव देण्यासाठी या मल्लांना आव्हान करण्यात आले आहे. फेब्रुवारीमध्ये कुस्ती मैदान घेण्याचे एकमताने ठरविण्यात आले.
यावेळी अनिल चौगुले, सदानंद हलगेकर, ईश्वर पाटील, विनित चौगुले, मधुकर वेर्लेकर, सुनिल हुक्केरीकर, मनोहर प्रधान, राजू चौगुले, शिवाजी पाटील, राजू जाधव, आनंद जांबोटकर, धनंजय हजगल, विनोद जाधव, उदय बाळेकुंद्री आदी उपस्थित होते. नितिन चौगुले यांनी आभार मानले.