पीडब्ल्यूसीच्या अहवालात माहिती ः 2021 च्या तुलनेत गुंतवणूक कमीच
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पीडब्ल्यूसीने केलेल्या एका पाहणीमध्ये भारतातील स्टार्टअप निधीमध्ये 2022 कॅलेंडर वर्षात दुप्पट इतकी वाढ नोंदवली गेली असल्याचे सांगितले जात आहे. ही गुंतवणूक कोरोनापूर्वीच्या स्थितीत पाहता दुप्पट आहे.
कॅलेंडर वर्ष 2022 मध्ये भारतीय स्टार्टअपमध्ये जवळपास 24 अब्ज डॉलर्सचा निधी गुंतवला गेला आहे. या याआधी म्हणजेच कोरोनापूर्वी 2019 मध्ये 12.8 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक स्टार्टअपमध्ये करण्यात आली होती. मागच्या वषीचा निधीचा आकडा पाहता 2021 मधील निधीपेक्षा 33 टक्के मात्र कमीच गुंतवणूक झाली असल्याची नोंद या ठिकाणी करण्यात आली आहे. 2021 मध्ये 35 अब्ज डॉलरची गुंतवणूक स्टार्टअपमध्ये झाली होती. व्यवसाय ते वाणिज्य या पातळीवरती कार्य करणाऱया ई-कॉमर्स स्टार्टअप कंपन्या जास्त करुन युनिकॉर्न बनल्या आहेत.
मागच्या वर्षी स्टार्टअपची संख्या घटली
वर्ष 2022 मध्ये नव्या युनिकॉर्न कंपन्यांची संख्या मात्र निम्म्याने घटली आहे. 2021 मध्ये 42 इतकी असणारी स्टार्टअपची संख्या 2022 मध्ये 21 इतकीच राहिली होती.