Baban Salgaonkar should be active in politics now; Appeal of Mahavikas Aghadi
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पुन्हा सक्रिय राजकारणात उतरावे यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांची शुक्रवारी गवळी तीठ्यावरील गुरुकुल येथे येथे भेट घेतली . साळगावकर यांनी आता राजकारणात सक्रिय व्हावे असे आवाहनही यावेळी केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बबन साळगावकर यांना सावंतवाडी विधानसभेची उमेदवारी दिली पक्षाने त्यांचे महत्त्व जाणले . त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आली होती आता साळगावकर यांनी मनात कुठले गैरसमज असतील तर ते दूर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रवाहात येऊन पक्ष वाढीबरोबर महाविकास आघाडी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.
साळगावकर यांना पूर्ण सहकार्य करण्यात येईल तसेच त्यांना पक्षात जबाबदारी देण्याबाबत वरिष्ठांची चर्चा करण्यात येईल असे प्रवीण भोसले यांनी सांगितले साळगावकर यांनीही भोसले यांच्या आवाहनाला सकारात्मक भूमिका दर्शवली आहे .महाविकास आघाडीचे नेते माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश रुपेश राऊळ यांनी गुरुकुल येथे बबन साळगावकर यांची घेतली भेट यावेळी माजी नगरसेवक विलास जाधव उपस्थित होते साळगावकर हे कट्टर शिवसैनिक होते त्यानंतर त्यानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता .अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर ते सावंतवाडीचे नगराध्यक्ष झाले त्यानंतर त्यांनी दीपक केसरकर यांच्या समवेत शिवसेनेत प्रवेश केला. ते थेट नगराध्यक्ष झाले .विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देत सावंतवाडी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निवडणूक लढवली. दोन वर्षे ते सक्रिय राजकारणापासून दूर आहेत परंतु आता त्यांना सक्रिय राजकारणात सहभागी होण्याचे आवाहन भोसले आणि महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांनी केले आहे आता साळगावकर काय भूमिका घेतात याकडे महाविकास आघाडीचे लक्ष आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी