प्रतिनिधी /पणजी
कुडणे येथील मिनानाथ मोहन जल्मी यांना केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाचा उस्त्रोजक पुरस्कार प्राप्त झाला असून तो दिल्ली येथील कार्यक्रमात त्यांना प्रदान करण्यात आला. त्यांनी शेळीपालन, कोंबडी पालन तसेच हळद लागवडीचा उस्त्रोग गोव्यात यशस्वी करून दाखवला असून ओल्ड-गोवा येथील केंद्रीय कृषी संशोधन केंद्राचे संचालक प्रवीण कुमार यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
या पुरस्काराचे जल्मी हे गोव्यातील प्रथम मानकरी असून रु. 40,000 रोख प्रशस्तीपत्र -चिन्ह ट्रॉफी असे त्याचे स्वरूप आहे. हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार असून कष्टाने तो मिळवला आहे. आजच्या तरूण पिढीसमोर त्यांचा हा पुस्कार आणि उद्योग म्हणजे आदर्श असून ते त्यासाठी सहकार्य करीत असतात.