प्रतिनिधी /पणजी
राज्यात आज गणेश जयंतीनिमित्त भरगच्च धार्मिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गोव्यातील सर्वात मुख्य सोहळा हा खांडोळा येथील श्री महागणपती मंदिरात होणार आहे.
फर्मागुढी, पणजी महालक्ष्मी मंदिराशेजारील गणपती मंदिर शिवाय सांतईनेज येथील आपटेश्वर गणपती मंदिर तसेच म्हापसा गणेशपुरी येथील गणेशमंदिर, हडफडे, डिचोली, सांखळी, बिंबल, सत्तरी, वास्को अशा अनेक ठिकाणच्या गणेश मंदिरांमध्ये सकाळपासून होम हवनादी कार्यक्रम तसेच श्री महागणेश याग आणि दुपारी आरत्या, कित्येक ठिकाणी दुपारी जन्मसोहळा होईल. कीर्तन, भजन, प्रवचन तसेच पालखीतून मिरवणूक काढण्यात येईल. अनेक ठिकाणी रात्री नाट्या प्रयोगाचेही आयोजन केले आहे. माघ शुद्ध 4 ची अर्थात माघी गणेश जयंती या नावाने प्रसिद्ध आहे.