नासाने शेअर केले छायाचित्र
@ वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
नासाच्या क्मयुरिऑसिटी रोव्हरने मंगळावर पाणी आणि लाटा असल्याचे आतापर्यंतचे सर्वात स्पष्ट पुरावे शोधून काढले आहेत. मंगळावरील ‘सल्फेट-बेअरिंग युनिट’ नावाच्या क्षेत्रातून रोव्हरचे मार्गक्रमण सुरू पाण्याच्या अस्तित्वाचे काही महत्त्वाचे पुरावे दिसून आल्याचे नासाने सांगितले. तलावांमध्ये निर्माण झालेल्या पाण्याच्या लहरींच्या स्पष्ट खुणा तेथील पृष्ठभागावर दिसून आल्या आहेत. नासाने यासंबंधी एक छायाचित्रही जारी केले आहे.
नासाने जारी केलेल्या छायाचित्रातून लाटांच्या खुणा आणि तलावाच्या तळाशी असलेला गाळही दिसून येत आहे. या लहरी कोटय़वधी वर्षांपूर्वी निर्माण झाल्या असण्याची शक्मयता आहे. ‘आम्ही संपूर्ण मिशनमध्ये पाहिलेला हा पाण्याचा आणि लाटांचा सर्वोत्तम पुरावा आहे,’ असे नासाने म्हटले आहे. नासाच्या कारसदृश आकाराच्या क्मयुरिऑसिटी रोव्हरने मंगळाच्या गेल पेटरचा शोध घेण्यात एक दशकाहून अधिक काळ घालवला आहे.